रामफळमध्ये अनेक खनिजे आणि मधुमेहविरोधी घटक असतात. जे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करतात . हे प्री-डायबेटिस आणि डायबेटिसच्या रूग्णांसाठी सेवन करण्यासाठी योग्य आहे.
रोग प्रतिकारशक्ती वाढते
हंगामी आजारांमुळे वारंवार आजारी पडणाऱ्यांनी रामफळाचे सेवन करावे. कारण, रामफळमध्ये व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे रामफळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामध्ये व्हिटॅमिन बी देखील भरपूर असते,
निरोगी त्वचा
बहुतेकदा, हार्मोन्स आणि प्रदूषणामुळे वयाच्या 30 नंतर लोकांना मुरुम येऊ लागतात. अशा परिस्थितीत रामफळाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. कारण, हे फळ पिंपल्स कमी करण्यासाठी वापरले आणि खाल्ले जाते.
जखम भरून येणे, जखम बरी होणे
रामफळाचे सेवन शरीरातील पेशींची जलद वाढ होण्यास मदत करते. लहान जखमांवर हे फळ खूप गुणकारी आहे. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.