आमच्यासाठी लिहा

आमच्यासाठी लिहा

आपल्या आजूबाजूला होणाऱ्या घडामोडींवर आपल्याला व्यक्त व्हावसं वाटतं. एखादा चित्रपट पाहिला किंवा वेब सिरीज पाहिली तर त्यावर आपलं मत व्यक्त करावसं वाटतं. द भोंगा आपल्या मनाला मोकळी वाट करून देण्यासाठी आपला प्लॅटफॉर्म खुला करत आहे. यासाठी तुम्हाला काही नियम आणि अटी लक्षात घ्यावे लागतील.

नियम आणि अटी

  • विषयाची निवड तुमच्यावर अवलंबून आहे. (चालू घडामोडीवर आपलं मत व्यक्त करू शकता. माहितीपर लेख लिहू शकता.)
  • राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक तसेच तुम्हाला योग्य वाटणाऱ्या विषयावर लिखाण करू शकता.
  • लेख वस्तुस्थितीवर आधारित असावा. लेखाच्या सोबत त्याचे संदर्भ जोडले तर अति उत्तम! त्यासाठी वेगवेगळ्या ऑनलाइन वर्तमानपत्रांच्या लिंक्स देखील जोडू शकता.
  • लेख देत असताना सोबत स्वतःचा अल्प परिचय आणि ई-मेल पत्ता द्यावा. या माहितीचा वापर लेखाच्या शेवटी करण्यात येईल. उदाहरण: लेखक राजकीय विश्लेषक आहेत किंवा लेखक भौतिकशास्त्राचे शिक्षण घेत आहेत.
  • लेख कॉपी पेस्ट करून लिहिलेला नसावा. असा प्रकार आढळून आल्यास लेख प्रसिद्ध केला जाणार नाही.
  • लेखात बदल करण्याचा अधिकार संपादकाकडे असेल. तशी पूर्वसूचना लेख लिहिणाऱ्याला दिली जाईल किंवा लेखात बदल करण्यास सुचवले जाईल.
  • लेख प्रसिद्ध करायचा का नाही याचे अधिकार संपादकाकडे असतील.
  • लेख जर प्रसिद्ध झाला नाही तर त्याचे कारण कळवले जाईल.

आपला लेख [email protected] या पत्त्यावर पाठवा. सोबत तुमचं संपूर्ण नाव, आणि विषयाचा उल्लेख असावा. जर तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील वर दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवू शकता.